केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा सचिव यांची स्‍वस्‍त धान्‍य दुकान व महाराष्ट्र राज्य वखार महामंडळास भेट


दैनिक स्थैर्य । दि. १७ सप्टेंबर २०२२ । सातारा । केंद्रीय अन्‍न व नागरी पुरवठाचे सचिव सुधांशु पांडे यांनी आज समर्थनगर, एम.आय.डी.सी. सातारा येथील श्री. ए. बी. पिंगळे यांच्या स्‍वस्‍त धान्‍य दुकानास भेट दिली. या भेटीमध्‍ये सचिवांनी दुकानाची पहाणी केली. लाभार्थ्यांशी संवाद साधला व समाधान व्‍यक्‍त केले.

दुकान अत्‍यंत नीटनेटके व स्‍वच्‍छ ठेवलेले असून लाभार्थ्यांना धान्‍याचे योग्यरित्या वाटप होत आहे. सर्व नोंदी अत्‍यंत व्‍यवस्थित ठेवलेल्या आहेत. या दुकानाबाबत लाभार्थी अत्‍यंत समाधानी आहेत असे अभिप्राय सुधांशु पांडे यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी उपायुक्‍त (पुरवठा) पुणे विभाग पुणे  त्रिगुण कुलकर्णी, जनरल मॅनेजर मनमोहन सिंग सारंग, जिल्‍हा पुरवठा अधिकारी स्‍नेहा किसवे-देवकाते, सहा.जिल्‍हा पुरवठा अधिकारी अमर रसाळ, पुरवठा निरीक्षण अधिकारी सुनिल शेटे, पुरवठा निरीक्षक संतोष दळवी, इ. उपस्थित होते.

या दौऱ्याप्रसंगी केंद्रीय अन्‍न व नागरी पुरवठाचे सचिव सुधांशु पांडे यांनी सातारा एमआयडीसी येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोडावूनलाही भेट दिली.


Back to top button
Don`t copy text!