स्थैर्य, मुंबई, दि. १३: यूनियन बँक ऑफ इंडियाने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंडवर आधारित असलेल्या लँडिंग रेट (एमसीएलआर) मध्ये १५ बेस पॉईंटने घट केली आहे. ओव्हरनाईट आणि एक महिन्याच्या एमसीएलआरला अनुक्रमे १५ आणि ५ बेसिस पॉइंट्सने कमी केलं आहे. यामुळे आता ओव्हरनाईट एमसीएलआर ६.७५ टक्क्यांच्या जागी ६.६० टक्के होणार आहे. तोच एका महीन्याचा एमसीएलआर ६.७० टक्क्यांपर्यंत जाईल, जो आधी ६.७५ टक्के इतका होता. ३ आणि ६ महिने तसेच १ वर्षाचा एमसीएलआर क्रमशः ६.९० टक्के, ७.०५ टक्के व ७.२० टक्के राहील. एमसीएलआर संबंधी हा नवा नियम ११ जानेवारी २०२१ पासून लागू करण्यात आल्याची माहिती बँकेने दिली आहे.