स्मशानभूमीजवळ ३५ वर्षीय अनोळखी तरुणाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला; फलटण शहर पोलिसांत नोंद


फलटण शहरातील मंगळवार पेठ स्मशानभूमीजवळील आठमोरी कॅनाललगत एका अंदाजे ३५ वर्षीय अनोळखी पुरुषाचा बाभळीच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. याप्रकरणी फलटण शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

स्थैर्य, फलटण, दि. ७ मार्च : फलटण शहरातील मंगळवार पेठ येथील स्मशानभूमीजवळ आठमोरी कॅनाललगत एका अंदाजे ३५ वर्षीय अनोळखी तरुणाचा बाभळीच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना शुक्रवार, दि. ६ मार्च रोजी सकाळी उघडकीस आली असून, याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या घटनेबाबत फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार आतिश हनुमंत चांदगुडे यांनी पोलिसांत वर्दी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार दि. ६ मार्च २०२६ रोजी सकाळी ०७.४० वाजेच्या पूर्वी मंगळवार पेठेतील स्मशानभूमी परिसरातील आठमोरी कॅनालजवळ एका अनोळखी पुरुषाने (वय अंदाजे ३५ वर्षे) बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

पोलिसांकडून ओळख पटवण्याचे आवाहन

याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात बी.एन.एस.एस. (BNSS) कलम १९४ प्रमाणे अकस्मात मृत्यू (रजि. नं. १४/२०२६) अशी नोंद करण्यात आली आहे. मयत व्यक्तीची अद्याप कोणतीही ओळख पटलेली नाही. सदर व्यक्ती कोण आहे आणि त्याने कोणत्या कारणातून हे टोकाचे पाऊल उचलले, याचा अधिक तपास सहाय्यक फौजदार (सफौ) बारेला हे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!