पुण्यात ‘युके स्ट्रेन’चा शिरकाव! पिंपरी-चिंचवडमध्ये तीन प्रवासी पॉझिटिव्ह

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, पुणे, दि.९: ब्रिटनमधून पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या तीन जणांमध्ये अधिक प्रभावशाली असलेला कोरोना म्हणजे ‘युके स्ट्रेन’ आढळून आला आहे. या तिघांवर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. २६८ प्रवाशी ब्रिटनमधून मुंबईमध्ये उतरले होते. त्यांचा शोध महानगर पालिकेने घेतला. त्यापैकी संशयित सात जणांचे नमुने पुण्यातील ‘एनआयव्ही’ला पाठविण्यात आले होते. यापैकी तिघांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. तसेच अन्य तीन ‘युके स्ट्रेन’ बाधित आढळले. आणखी एका प्रवाशाचा तपासणी रिपोर्ट येणे बाकी आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरात काल दिवसभरात १५० कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, ९१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील नव्या रोनाबाधितांची संख्या ९७ हजार ४४२ वर पोहोचली असून, यापैकी ९३ हजार ९९७ जण बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६३९ असल्याचीअशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.


Back to top button
Don`t copy text!