दैनिक स्थैर्य | दि. २४ सप्टेंबर २०२४ | फलटण |
कोळकी (ता. फलटण) येथील संत सावतामाळी कमानीसमोर असलेली न्यू आशिष प्लाय अँड ग्लास सेंटर तसेच त्याच्या शेजारी असणारे पखाले प्लंबिंग मटेरिअल अँड सिरॅमिक सप्लायर्स या दोन दुकानात चोरट्यांनी २२ सप्टेंबरच्या रात्री दुकानांवरील पत्रा उचकटून आत प्रवेश करून दुकानातील सुमारे १४ लाखांचे साहित्य लंपास केले आहे. या चोरी प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात दुकानमालक अक्षय राजेंद्र घनवट (वय २६, व्यवसाय – प्लायवुड अँड हार्डवेअर विक्रेते, रा. शारदानगर, कोळकी, ता. फलटण) यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या चोरीत अक्षय घनवट यांच्या प्लायवूड आणि हार्डवेअर दुकानातून
१) २,७०,९००/- रुपये किमतीचे कडी कोयंडे असलेले ६८ बॉक्स
२) २,८३,५००/- पितळी बिजागरी, दरवाजाचे कुलूप
३) ६३,९५६/- रुपयांचे ड्राँवर स्लायडर, सिक्सर व्हील, खिळे, कपाट लाँक, ड्राँवर लाँक, पुश लाँक, मशिन स्क्रू
४) १८,०००/- रुपये रोख रक्कम वगैरे
५) इतर सामान
असे एकूण ६,४६,३५६/- रुपयांचे साहित्य चोरीस गेले आहे.
दुसरे दुकानमालक शशिकांत जयसिंग पखाले (वय ४२ वर्षे, रा. पखाले मळा, कोळकी, ता. फलटण) यांचे पखाले प्लंबिंग मटेरिअल अँड सिरॅमिक सप्लायर्स या दुकानातून
१) १,८३,८२०/- रुपये किमतीचे फ्लोरा सिरीजचे किचन काँक, बेसीन काँक, बिब काँक, अँगल स्टाँक, शाँवर, पुश काँक, वाँलमिक्सर.
२)३,३७,८००/ -रू.किंमतीचे जागवार कंपनिचे वाँलमिक्सर बेसीन काँक, बिब काँक, टु वे बिब काँक, अँगल स्टाँक काँक, शाँवर, पुश काँक, जागवार कंपनिचे वाँलमिक्सर फ्लश काँक तसेच इतर काँक.
३)१,०१,२४०/- रू.किंमतीचे के.सी.आय. कंपनिचे कृष्णा सिरीजचे ०४ वाँलमिक्सर, किचन काँक, बेसीन काँक, बिब काँक, टु वे बिब काँक, अँगल स्टाँक काँक, बेसीन काँक, फ्लश काँक.
४)३६,०००/- रू. पुश काँक
५)३१,८००/- रू.किंमतीच्या सी.आर.आय. कंपनिच्या ०५ ईलेक्ट्रीक मोटर
६)१६,०००/- रू.किंमतीचे व्ही गार्ड कंपनिचे ईलेक्ट्रीक वाँटर हिटर.
७) व इतर सामान
८) ८,८००/- रुपये रोख रक्कम
असा एकूण ७,२५,४६०/- रुपयांचा माल चोरला आहे.
या चोरीचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एस. आर. शिंदे करत आहेत.