
दैनिक स्थैर्य । दि. १६ जून २०२२ । सातारा । सातारा शहर व परिसरातून दोन जण बेपत्ता झाल्याची तक्रार संबंधित पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १४ जून रोजी सहा वाजण्याच्या दरम्यान, शाहूपुरी परिसरातील आझादनगर येथून राहत्या घरातून किसाबाई विठ्ठल धनावडे वय ७० या महिला राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता निघून गेल्या आहेत. त्या अद्याप घरी परत न आल्याने त्यांची सून प्रतिमा मारुती धनावडे यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. दुसऱ्या घटनेत, दि.१३ जुन रोजी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास करंजे, सातारा येथील बसप्पापेठ येथून रशीदा अब्दुल खालिद अन्सारी वय २८ या घरात कोणास काहीही न सांगता निघून गेल्याने त्याची फिर्याद अब्दुल खलील हुसेन अन्सारी यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली.