
स्थैर्य, अहमदाबाद, 19 : रहिवासी इमारतीमध्ये दोन जणांसह 4 मुलांचे मृतदेह आढळल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. गुजरातमधील अहमदाबाद इथे ही धक्कादायक घडना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले असून त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दोन जणांसह 4 मुलांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत.
4 मुलांची हत्या करून दोघांनी स्वत:ला संपवलं असावं अशी शंका व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हत्या आहे की आत्महत्या याचा पोलिसांकडून सध्या तपास सुरू आहे. तर तर ही आत्महत्या असल्याचा दावा वडिलांनी पोलिसांकडे केला आहे.