जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोघांच्या गळफास घेऊन आत्महत्या


दैनिक स्थैर्य । दि. ३० ऑगस्ट २०२२ । सातारा । जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोघांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची नोंद संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये झाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 28 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजण्याच्या पूर्वी कुमठे तालुका कोरेगाव गावच्या हद्दीत राहत्या घरी विकास जनार्दन जाधव वय 45 यांनी लोखंडी अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबतची खबर श्रीमंत हनुमंत जगदाळे वय 71 यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. दुसऱ्या घटनेत दिनांक 27 ऑगस्ट रोजी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी संदीप दिनकर शिंदे वय 42 राहणार बेलवडे, तालुका कराड यांनी दारूच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खबर पांडुरंग शंकर शिंदे राहणार बेलवडे, तालुका कराड यांनी तळबीड पोलीस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार रजपूत करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!