कराडमधील दोन बाधित कोरोनामुक्त; आज सोडले घरी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, सातारा दि. 25 : कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असणाऱ्या 75 वर्षीय महिला व 24 वर्षीय युवक हे दोन कारोना बाधित रुग्ण आज कोरोना मुक्त झाले असून त्यांना आज रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.

या दोन रुग्णांची   14 व 15 दिवसा नंतर पुन्हा चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये हे  बाधीत रुग्ण निगेटिव्ह आले आहेत. या दोन जणांना आज  सोडण्यात आले. कृष्णा चॅरिटेबलचे अध्यक्ष डॉ. सुरेश  भोसले, या कॉलेज आणि हॉस्पिटलचे डीन डॉ.ए.वाय. क्षीरसागर  यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी डॉक्टर्स, परिचारिका व कर्मचारी उपस्थित होते.

आत्तापर्यंत जिल्ह्यात 309 कोरोना बाधित आढळले असून त्यापैकी 122 जण पूर्णपणे बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!