पार्किंगमधून दुचाकी चोरणार्‍या टोळीचा पर्दाफाशसहाजणांना अटक, तीन मोटारसायकली हस्तगत


 

स्थैर्य, शिरवळ, दि.९: शिरवळ, ता. खंडाळासह सातारा तालुका व पुणे जिल्ह्यात धुमाकुळ माजवत गृहसंकुलाच्या पाकिंगमधून महागड्या मोटार सायकली चोरणार्‍या सराईत टोळीचा शिरवळ पोलिसांनी पर्दाफाश केला. टोळीतील पाच जणांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. यातील फरार सुत्रधाराचा पोलीस कसून शोध घेत आहेत. रोहित उर्फ डंगर्‍या शंकर जाधव (वय 20 वर्ष, रा. चिंचणी, ता. खटाव हल्ली रा. जळगाव नाका कोरेगाव, जि. सातारा) 2) विजय बाळु जाधव (वय -20 वर्ष, रा. भाडळे, ता. कोरेगाव, जि. सातारा) 3) सागर जाधव (वय 25 वर्ष, रा. भाडळे, ता. कोरेगाव, जि. सातारा) 4) अमीर बाबु मुल्ला (वय – 22 वर्ष, रा. गोंदे, गावठाण, रेठरे यू, ता. कराड, जि. सातारा) 5) सागर दत्तात्रय कुंभार (वय -20 वर्ष, रा. वडोली निळेश्‍वर, ता. कराड, जि. सातारा) 6) सुशांत धोंडीराम लोखंडे (वय -24 वर्ष, रा. कोपर्डे हवेली, ता. कराड, जि. सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर मुख्य सूत्रधार चेतन उर्फ चेत्या संभाजी जाधव (वय – 22 वर्ष, रा. ढगेवाडी, ता. जि. सातारा) याचा शिरवळ पोलीस शोध घेत आहेत.

याबाबतची माहिती अशी की, शिरवळ, ता. खंडाळा गावच्या हद्दीत पवार आळी याठिकाणी सणार्‍या साई विश्‍व अंगण या गृह संकुलातील व श्रीपुरम् बिल्डिंग, पवारआळी येथील पार्किंगमधील दोन महागड्या मोटार सायकली त्यामध्ये योगेश दत्तात्रय लोले यांच्या मालकीची एफ. झेड मोटार सायकल ( क्रमांक एम.एच .15 एफ. पी. 1264) 5 प्रतिक दत्तात्रय नवले यांच्या मालकीची सुझुकी जिक्सर मोटार सायकल ( क्रमांक एम. एच. 45 एक्स 8451) या दोन्ही महागड्या मोटार सायकली चोरीस गेल्या होत्या. 

यामुळे शिरवळ परिसरात खळबळ उडाली होती. त्यानंतर शिरवळ पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. यामध्ये रोहित उर्फ डंगर्‍या शंकर जाधव याच्यासह त्याच्या साथीदारांनी चोरल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलीसांनी कोरेगावात वैद्यकीय पथकाचा वेश परिधान करुन रोहित उर्फ डंगर्‍या जाधव याला मोठ्या शिताफीने जेरबंद केले. रोहित उर्फ डंगर्‍या या जाधव याच्याकडे चौकशी केली असता गुन्ह्यामध्ये सागर जाधव, विजय जाधव व चेतन जाधव यांची नावे निष्पन्न झाली. त्याचप्रमाणे संबधितांवर वाठार व लोणंद पोलीस ठाणे हद्दीमध्ये दरोडा व घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले. संबधितांनी सातारा तालुका पोलीस ठाणे हद्दीमधील किडगाव येथील अमर शशिकांत इंगवले यांच्या मालकीची महागडी मोटार सायकल (क्रमांक एम. एच. 11 सी.बी.9801) चोरुन नेल्याचे कबुल केले. सराईत गुन्हेगार असलेल्या चोरट्यांनी सदरील महागड्या मोटार सायकली ह्या विविध ठिकाणी कवडीमोल दराने विकल्या असल्याचे कबुल केले. तपासाअंती विविध ठिकाणी विकलेल्या तीन मोटार सायकली शिरवळ पोलीसांनी जप्त केल्या आहेत. त्याचबरोबर पुणे येथील भारती विद्यापीठ पोलीस ठाणे हद्दीतील शनी मंदिर चौक याठिकाणी पार्किंगमध्ये लावलेली पल्सर मोटार सायकल चोरुन विकण्यासाठी सातारा जिल्ह्यातील कराड याठिकाणी घेऊन जात असताना शिरवळ गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार व संशयावरुन सराईत गुन्हेगार 1 ) अमीर बाबु मुल्ला ( वय -22 वर्ष , रा . गोंदेगावठाण , रेठरे बृ , ता . कराड ) 2 ) सागर दत्तात्रय कुंभार ( वय -1 9वर्ष , रा . वडोली निळेश्‍वर , ता . कराड ) 3 ) सुशांत धोंडीराम लोखंडे ( वय -24 वर्ष , रा . कोपर्डे हवेली , ता . कराड ) यांना पकडुन त्यांनी शनी मंदिर चौक , पुणे येथुन चोरलेली ऐंशी हजार रुपये किमतीची पल्सर मोटार सायकल ताब्यात घेऊन सराईत गुन्हेगार असलेल्या तिघांना भारती विद्यापीठ पोलीस ठाणे यांच्याकडे दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये वर्ग केले आहे . संबधितांकडुन विविध गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

ही कारवाई सातारा पोलीस अधीक्षक मा . अजयकुमार बन्सल सोो , मा . अपर पोलीस अधीक्षक मा . धिरज पाटील सो व फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी मा . तानाजी बरडे सोो , पोलीस निरीक्षक उमेश हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उप निरीक्षक सागर अरगडे , पोलीस अमंलदार रविंद्र कदम , जितेंद्र शिंदे , अमोल जगदाळे , स्वप्निल दौंड , जयवंत घोरपडे यांनी केली आहे . या घटनेची नोंद शिरवळ पोलीस ठाणेस झाली असून अधिक तपास पोलीस अमंलदार संजय पंडीत हे करीत आहेत .


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!