एसटीचे चाक डोक्यावरून गेल्याने दोन जण जागीच ठार शिरवळ येथे अपघात , मित्राला सोडायला जाताना काळाचा घाला

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, खंडाळा, दि. १६: शिरवळ येथे एसटीचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार झाले तर एकजण गंभीर जखमी झाला. कुणाल संजय चव्हाण (वय १८),आदित्य देविदास चव्हाण (वय १४,दोघे रा. लोणी ता.खंडाळा ) असे जागीच ठार झालेल्यांची नावे आहेत सर्व ओंकार संजय भोसले (वय १८ रा.लोणी ता.खंडाळा ) असे गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.

याबाबतची शिरवळ पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि, लोणी ता.खंडाळा येथील कुणाल संजय चव्हाण हा शिक्षणासाठी चिपळूण जि.रत्नागिरी याठिकाणी आहे. सोमवार दि.१५ मार्च रोजी कुणाल चव्हाण याला चिपळूणला जाण्याकरिता शिरवळ येथे सोडण्यासाठी ओंकार संजय भोसले हा दुचाकीवरून कुणाल चव्हाण व त्याचा चुलत भाऊ आदित्य चव्हाण हे शिरवळला निघाले होते.

यावेळी दुचाकी कुणाल चव्हाण चालवीत होता. दरम्यान,दुचाकी हि शिरवळ गावच्या हद्दीमध्ये फुलोरा सोसायटीजवळ आली असता एसटीने हुलकावणी दिल्याने त्यांची दुचाकी समोरील हातगाडीला धडकली व गाडीवरून ते खाली पडले. यावेळी नीरा-लोणंद-शिरवळ-भोर या एसटीचे चाक हे रस्त्यावर पडलेल्या दुचाकीचालक कुणाल चव्हाण व आदित्य चव्हाण याच्या डोक्यावरून गेल्याने गंभीर जखमी झाल्याने दोघेही जागीच ठार झाले तर दुचाकीवरील ओंकार भोसले हा गंभीर जखमी झाला आहे.

कुणाल चव्हाण व आदित्य चव्हाण यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात येऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या घटनेमुळे लोणी गावावर शोककळा पसरली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई हे करीत आहे.


Back to top button
Don`t copy text!