पुलावरून दुचाकी खाली कोसळून दोन ठार, तुळसण पूलावरील घटना, एकजण गंभीर जखमी


स्थैर्य, कराड, दि. २०: कराड-चांदोली रोडवर बांधकाम सुरू असलेल्या तुळसण पुलावरुन दुचाकी खाली कोसळून दोन ठार, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. जानु भैरु झोरे (वय 35) व धोंडीबा भागोजी पाटने (वय 33) दोघेही रा. चांदोली वसाहत, मूळ रा. सोनार्ली वसाहत, भेंडवडे ता. हातकणंगले अशी मृत्यू झालेल्रांची नावे आहेत तर दगडू बिरू झोरे रा. चांदोली वसाहत, मूळ रा. सोनार्ली वसाहत, भेंडवडे ता. हातकणंगले हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कराड येथील रुग्णालरात उपचार सुरू आहेत.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कराड-चांदोली मार्गावर ओंड-उंडाळे दरम्यान तुळसण पुलाचे बांधकाम सुरू आहे. यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद करून पुलाच्या बाजूने वाहतुकीस मार्ग तयार करण्यात आला आहे. परंतु, रात्री दुचाकी भरधाव वेगात असल्राने बॅरिकेड्स तोडून ती पुलावरून खाली कोसळली. हा अपघात एवढा भीषण होता की, दोन जण ठार झाले. त्यांचे मृतदेह मृतदेह पुलाच्रा बांधकामातील सळ्यामध्ये अडकले होते. पोलिसांनी स्थानिकांच्रा मदतीने मृतदेह बाहेर काढले. अपघातात दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची नोंद कराड ग्रामीण पोलीस ठाण्रात झाली असून राप्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलिस करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!