
दैनिक स्थैर्य । 15 एप्रिल 2025। फलटण । काल 14 एप्रिल 2025 रोजी फलटण शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या, ज्यामध्ये दोन्ही गृहिणी यांचा समावेश आहे. पहिली घटना गिरवी नाका ते जाधववाडी रोडवर सायंकाळी 7.15 वाजता घडली, तर दुसरी घटना बारवबाग लक्ष्मीनगर येथे सायंकाळी 7.45 वाजता घडली.
पहिल्या घटनेत, गिरीधर क्लासेसच्या समोरील वृंदावन बंगल्याच्या समोर या ठिकाणी दोन अनोळखी इसमांनी काळ्या मोटारसायकलवरून फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचे चैनमधील मिनी गंठण हिसकावले. या गंठणाची किंमत 60,000/- रुपये आहे. दुसऱ्या घटनेत, चैतन्य नागरी सहकारी पतसंस्थेच्या शेजारी स्वामी हॉस्पिटलच्या समोर दोन अनोळखी इसमांनी सोन्याचे चैनमधील मिनी गंठण हिसकावले, ज्याची किंमत 54,000/- रुपये आहे.
दोन्ही घटनांची F.I.R. नोंद झाली असून पोलीस तपास अधिकारी गणेश सुर्यवंशी आणि पूनम बोबडे यांनी तपास सुरू केला आहे. आरोपींविरुद्ध 304(2) आणि 3(5) कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.