साताऱ्यातून बुलेटसह दोन दुचाकी लंपास 


दैनिक स्थैर्य | दि. २१ ऑक्टोबर २०२१ | सातारा | साताऱ्यातील गुरुवार पेठेतील कसबा हायटस येथील पार्किंगमधून ७० हजार रुपये किंमतीची इनफिल्ड बुलेट क्रमांक एम. एच. ११ सी. एफ. ९७२३ ही दि. १७ रोजी अज्ञात चोरटय़ाने चोरुन नेली. याबाबत रफीक मुसा मोमीन वय ५४ रा. कसबा हायटस, गुरुवार पेठ, सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या चोरीचा अधिक तपास पोलीस नाईक इंगवले करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर दुसऱया घटनेत मंगळवार पेठेतून २० हजार रुपये किंमतीची स्कूटी क्रमांक एम. एच. ११ के. ९३७६ ही अज्ञात चोरटय़ाने चोरुन नेल्याची तक्रार निशा सुहास जाधव वय ३९, रा. मंगळवार पेठ, सातारा यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली आहे. याबाबत पोलीस हवालदार जाधव अधिक तपास करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!