
दैनिक स्थैर्य | दि. १६ मार्च २०२३ | फलटण |
साखरवाडी, ता. फलटण, जि. सातारा गावचे हद्दीत १४ मार्च रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास साखर कारखान्याच्या गेट झालेल्या वादातून दोघाजणांना चौघांनी लाकडी दांडके, लोखंडी गजाने मारहाण केल्याची फिर्याद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात राहुल विठ्ठल सोनवलकर (वय ३२, रा. सोमंथळी, तालुका फलटण) यांनी दिली आहे. या प्रकरणी निवृत्ती सर्जेराव भोसले, सुरेश गणपत भोसले, ज्ञानेश्वर विश्वास भातकर यांच्यासह एक अज्ञात इसमावर (सर्व राहणार साखरवाडी, तालुका फलटण) पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, साखरवाडी (ता. फलटण) गावच्या हद्दीतील साखर कारखान्याच्या गेटवर फिर्यादीचे ट्रॅक्टर वरील चालक सतीश आसाराम जाधव यास तेथील लोकांनी मारहाण केली, असा फोन आल्याने फिर्यादी राहुल सोनवलकर व फिर्यादीचे मित्र गणेश बाळासो सोडमिसे यांनी साखरवाडी साखर कारखाना येथे ट्रॅक्टरवरील चालक सतीश जाधव यास मारहाण कोणी केली, असे विचारले असता वरील आरोपींनी फिर्यादी व फिर्यादीचा मित्र गणेश बाळासो सोडमिसे यांना शिवीगाळ, दमदाटी करून हाताने, लाथाबुक्क्यांनी व लोखंडी गजाने, उसाने, लाकडी दांडक्याने मारहाण केली आहे, अशी तक्रार दाखल झाली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी वरील चौघांवर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार हंगे करत आहेत.