सातारा जिल्ह्यातील चार टोळ्यातील तेवीसजण तडीपार; पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांचा आदेश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २१ एप्रिल २०२२ । सातारा ।  कराड सातारा उंब्रज व पाटण या चार ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या चार टोळ्यांमधील तब्बल 23 जणांना तडीपार करण्याचा महत्त्वपूर्ण आदेश पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिला आहे संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी घेतलेला हा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय मानला जात आहे.

कराड शहरामध्ये शिवीगाळ दमदाटी दगडफेक सरकारी कामात अडथळा करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी टोळी प्रमुख विशाल घोडके व 29 शनिवार पेठ कराड गणेश वायदंडे बुधवार पेठ कराड सोन्या निलेश लोखंडे वय 27 राहणार गुरुवार पेठ कराड शुभम सुनील जाधव राहणार बुधवार पेठ कराड आदित्य मदन घाडगे 24 राहणार शुक्रवार पेठ कराड बजरंग सुरेश माने व 20 राहणार बुधवार पेठ कराड पवन सुनील भोसले वय एकवीस राहणार बुधवार पेठ कराड सत्यजित गोरख सूर्यवंशी y23 राहणार शिक्षक कॉलनी शनिवार पेठ कराड योगेश दादा भोसले वय 20 राहणार बुधवार पेठ कराड प्रतीक विजय साठे व 28 राहणार बुधवार पेठ कराड संकेत राजे डांगे वय 23 राहणार शुक्रवार पेठ कराड या अकरा इसमांना हद्दपार करण्याचे आदेश अजय कुमार बंसल यांनी दिले कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी आर पाटील यांनी हा प्रस्ताव सादर केला होता पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी पोलीस अधिनियम 1951 च्या पंचावन नुसार या अकरा जणांना सातारा जिल्हा आणि लगतच्या सांगली जिल्ह्यातील शिराळा वाळवा कडेगाव या तालुक्यातून सहा महिन्यासाठी हद्दपार केले आहे.

कराड शहराच्या हद्दीत चोरी सरकारी कामात अडथळा गर्दी मारामारी दगडफेक खंडणी विनयभंग इत्यादी गंभीर गुन्हे करणाऱ्या कुंदन जालिंदर कराडकर वय 27 राहणार सैदापूर तालुका कराड या टोळी प्रमुखांसह अर्जुन यशवंत कुंभार वैती शनिवार पेठ तालुका कराड अभिजीत संजय पाटोळे वय बावीस राहणार बुधवार पेठ कराड या तिघांविरुद्ध सुद्धा वरिष्ठ पोलीस निरीक्षक कराड शहर यांनी हद्दपारीचे प्रस्ताव सादर केला होता कलम 55 नुसार पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी या तिघांना संपूर्ण सातारा जिल्हा व लगतच्या सांगली जिल्ह्यातील शिराळा वाळवा कडेगाव या तालुका हद्दीतून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचा आदेश दिला आहे.

सातारा शहरातील खंडणी दारूविक्री दरोडा एचडी गंभीर गुन्ह्यांमध्ये जयसिंग जनार्धन कांबळे या टोळी प्रमुखांसह राहणार प्रतापसिंह नगर खेड वय 34 अजय देवराम राठोड वय 29 सु श्री तानाजी सावंत व अठरा अजय जाधव वय 22 ऋत्विक अजय जाधव वय 19 गणेश विलास चव्हाण राहणार लक्ष्मी टेकडी सदर बाजार सातारा यांना हद्दपार करण्याचा प्रस्ताव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी सादर केला होता पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी सगळ्यांना संपूर्ण सातारा जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचा आदेश पारित केला आहे.

याशिवाय उंब्रज व पाटण पोलीस ठाणे हद्दीत शिवीगाळ दमदाटी सार्वजनिक ठिकाणी उपद्रव घरफोडी गंभीर शारीरिक दुखापती यासारखे गंभीर गुन्हे करणारे डुबऱ्या सुनील पाटील वय बावीस या टोळी प्रमुखांसह समीर आम्ही मनेर वय 30 सोहेल सलीम मोमिन वय30 सर्वजण राहणार उंब्रज तालुका कराड यांना हद्दपार करण्याचा प्रस्ताव सहाय्यक पोलीस निरीक्षक उंब्रज पोलीस ठाणे अजय गोरड यांनी सादर केला होता कलम 55 नुसार या टोळीला संपूर्ण सातारा जिल्हा आणि सांगली जिल्ह्यातील शिराळा वाळवा कडेगाव तालुका हद्दीतून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश अजय कुमार बंसल यांनी दिले आहेत.

वरील चार टोळीतील तेवीस सदस्यांना त्यांचे वर्तन सुधारण्याची वारंवार संधी देण्यात आली होती मात्र त्यांच्या सुधारणा झाली नाही त्यामुळे नतेमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये याकरिता गुन्हेगारी वर्तुळातील 23 जणांना एक वर्षासाठी सातारा जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे या कारवाईचे सातारा जिल्ह्यातून स्वागत होत आहे जिल्हा पोलीस प्रमुख विजय कुमार बंसल यांनी पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारलेले पासून ते 30 प्रस्तावातील 130 इसमांना सातारा जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा विक्रम नोंदवला आहे या हद्दपार प्राधिकरणात पुढे सरकार पक्षाच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ पोलीस निरीक्षक मधुकर गुरव पोलीस हवालदार प्रमोद सावंत केतन शिंदे अनुराधा सणस यांनी योग्य सहकार्य करून कागदोपत्री पुरावे सादर केले.


Back to top button
Don`t copy text!