
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. ९ मार्च २०२३ | फलटण |
फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी येथे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही २३ वा श्री संत तुकाराम महाराज बीजोत्सव भक्तिभावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
बीज उत्सवाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात श्री संत तुकाराम गाथा पारायण ह.भ.प. गोविंद गावडे महाराज यांनी वाचन केले. युवा किर्तनकार ह.भ.प. श्रीराम गुलदगड महाराज यांचे किर्तन झाले.
या उत्सवासाठी एन. के. आटोळे, भगतसिंग गोविंद गावडे, राधेश्याम नानाभाऊ गावडे यांनी अन्नदान केले. बीज उत्सवास फलटण पूर्व भागातील खटकेवस्ती, पवारवाडी, साठे, गुणवरे तसेच मेखळी, घाडगेवाडी (ता.बारामती) परिसरातील भाविकांनी हजेरी लावली होती.
