सभासदांचा विश्वास हाच के. बी. उद्योग समूहाचा पाया : सचिन यादव

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 19 जानेवारी 2024 | फलटण | सभासदांनी दाखवलेल्या विश्वासार्हतेची जपणूक करीत पारदर्शक व काटकसरीच्या कारभारामुळे गॅलेक्सी को-ऑपरेटिव्ह पतसंस्थेस पाच वर्षात तिसऱ्यांदा उत्कृष्ट व्यवस्थापनाचा बँको पुरस्कार मिळाला आहे. अल्पावधीत पतसंस्था ठेवेदार सभासद ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरली आहे. विश्वासहार्यता हा के. बी. उद्योग समूहाचा पाया आहे. शेवटच्या श्वासापर्यंत त्याची जपणूक केली जाईल; असे प्रतिपादन गॅलेक्सी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन यादव यांनी केले.

के. बी. उद्योग समूहाच्या हॉलमध्ये आयोजित गॅलेक्सी पतसंस्थेच्या सभासद ग्राहक मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पतसंस्थेच्या संचालिका सौ. सुजाता यादव, रणजित जगताप, मनोज जाधव, परिनिता खराडे यांच्यासह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.

सचिन यादव पुढे म्हणाले की; कृषी निर्यात क्षेत्रात के. बी. उद्योग समूहाचा लौकिक आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलेला आहे. शेतकऱ्यांनी दाखवलेल्या विश्वासास सर्वार्थाने आम्ही पात्र ठरलेलो आहोत. आम्ही सुरू केलेल्या विषमुक्त कृषी उत्पादनाच्या चळवळीलाही प्रतिसाद वाढत आहे. शेतकरी, के. बी. उद्योग समूहाचे कर्मचारी, व्यावसायिक यांच्या आर्थिक गरज पुर्तीसाठी गॅलेक्सी पतसंस्था गत पाच वर्षापासून प्रयत्नशील आहे.

गरजू पात्र व्यक्तींना 48 तासात पतसंस्थेमार्फत कर्ज पुरवठा केला जातो. सभासदांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी पतसंस्था कटिबद्ध आहे. सभासदांचा विश्वास हीच आमची सर्वात मोठी पुंजी आहे. पतसंस्थेने चाळीस कोटीचा व्यवसायाचा टप्पा पार केला आहे. पतसंस्थेचा एनपीए 0.5 टक्के असून तो शून्यापर्यंत ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सहकार क्षेत्रामध्ये पतसंस्थेचा नवलौकिक वाढत आहे याचा आम्हाला अभिमान आहे. अभ्यासू संचालक, कार्य तत्पर कर्मचारी व ठेवीदारांचा विश्वासामुळे पतसंस्था नफ्यात असून ऑडिट वर्ग अ मिळाला आहे; असेही यादव यांनी स्पष्ट केले.

पतसंस्थेचे संचालक हेमंत खलाटे यांनी पतसंस्थेच्या स्थापनेची माहिती सांगून संस्थेच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या विविध कर्ज व ठेव योजनांतून सभासदांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यास मदत झाल्याचे सांगितले.

संचालक गणेश निकम यांनी पतसंस्थेचा आर्थिक प्रगतीचा आढावा घेतला तर लक्ष्मण पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

पतसंस्थेचे संस्थापक सचिन यादव यांच्यावरील विश्वासाहर्तेमुळे पतसंस्था नावारूपाला येत असून संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांची संस्थेच्या प्रती असलेली निष्ठा व पतसंस्थेस असलेली आर्थिक शिस्त यामुळे पतसंस्थेचा नावलौकिक वाढत असल्याचे मत सभासद विवेक गायकवाड, पोपट मिंड, विद्यादेवी निंबाळकर व सुरेश भोंगळे  यांनी व्यक्त केले.

संचालक संदीप लोंढे यांनी आभार मानले. मेळाव्यास संस्थेचे सभासद ठेवीदार, के. बी. उद्योगसमूहाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!