
दैनिक स्थैर्य । 21 मे 2025। बारामती । सावळ, ता. बारामती तृप्ती जितेंद्र विरकर यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. तृप्ती वीरकर या सिव्हिल इंजिनिअर म्हणून कार्य करत आहेत.
या प्रसंगी उपसरपंच चेतन आटोळे, सदस्य सुनीता आवाळे, ज्योती आवाळे, रोहिणी खोमणे, सारिका आटोळे, फक्कड बालगुडे, नितीन भिसे, ग्रामसेवक राहुल सरक, दत्तात्रय आवाळे, प्रवीण आटोळे, जितेंद्र वीरकर, प्रमोद आवाळे, बाळासाहेब वीरकर, उत्तम वीरकर, रमेश साबळे आदी मान्यवर उपस्थित होते
बारामती तालुक्यातील सर्वात प्रगत व विकसित म्हणून सावळ गावची ओळख आहे. शासनाच्या विविध योजना तळागाळामध्ये पोहोचवू व सावळगाव विकास कामांमध्ये अग्रेसर ठेवू अशी ग्वाही निवडणुकीनंतर नवनिर्वाचित सरपंच तृप्ती विरकर यांनी दिली
सावळ गाव माहेर व सासर असल्याने विकासकामात कमी पडणार नाही निवडणूक झाल्यावर मिरवणुक न काढता व मिरवणूक चा खर्च टाळून ग्रामपंचायतीच्या विकासासाठी मदत देणार आहे.
तृप्ती वीरकर, (नवनिर्वाचित सरपंच)