
दैनिक स्थैर्य । दि. 19 मे 2025 । फलटण । सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून युद्धजन्य परिस्थितीमध्ये भारतीय सैन्याला प्रोत्साहन आणि नागरी पाठिंबा देण्यासाठी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन फलटण येथे करण्यात आले आहे. तरी उद्या दिनांक 20 मे 2025 रोजी सकाळी ९ वाजता तहसील कार्यालय परिसर येथून तिरंगा रॅलीची सुरुवात होईल. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी केले आहे.
सदरील रॅलीचा मार्ग हा तहसील कार्यालय (सुरुवात), महात्मा फुले चौक, गजानन चौक, उमाजी नाईक चौक, महावीर स्तंभ, डॉ.आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक (समाप्ती) असा असणार आहे.
तरी फलटण तालुक्यातील व शहरातील सर्व नागरिक , पदाधिकारी, विद्यार्थी मित्र, सर्व सामाजिक संस्था/ मंडळे , माजी सैनिक संघटना तसेच पोलीस भरती आणि सैन्य भरती प्रशिक्षण संस्था यांनी सहभागी होऊन भारतीय सैन्याला मोठ्या प्रमाणात पाठिंबा द्यावा, असे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे.