पाटण येथे तिरंगा रॅली उत्साहात

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Channel Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 21 मे 2025। सातारा । पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलाने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवादांची ठिकाणे उद्धवस्त केली. दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यदल उत्तर देवू शकतो हे जगाला दाखवून दिले, असे सांगून पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी भारतीय सैन्यदलाबद्दल आभार व्यक्त केले.

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत पाटण येथे तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. प्रांताधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार अनंत गुरव, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सतेश हंगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, माजी सैनिक व नागरिक यांनी तिरंगा रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

देशातील जनता ही भारतीय सैन्य दलाच्या पाठीशी आहे. भारतीय सिमेचे रक्षण आपले सैन्यदल करीत आहे. त्यांच्या शौर्यामुळे आपण सुरक्षीत आहोत, असेही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी तिरंगा रॅली प्रसंगी सांगितले


Back to top button
Don`t copy text!