
स्थैर्य, फलटण, दि. 3 ऑक्टोबर : राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त येथील काँग्रेस पक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी (बेडके), शहराध्यक्ष पंकज पवार, सामाजिक कार्यकर्ते विराज खराडे, अमीर शेख उपस्थित होते.
यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी मनोहर गायकवाड, बालमुकुंद भट्टड, ताजुद्दीन बागवान, अल्ताफ शेख, गंगाराम रणदिवे, मंजेखान मेटकरी, अजय इंगळे, विकास ननावरे, सोहराब खान, भारत अहीवळे, पी.एन. शिंदे, बी.पी. काटकर, अर्जुन पवार यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.