
स्थैर्य, गिरवी, दि. ११ ऑगस्ट : गिरवी (ता. फलटण) येथील थोर स्वातंत्र्य सैनिक धोंडीराम कदम यांचे सुपुत्र, कृषी मित्र स्वर्गीय बुवासाहेब धोंडीराम कदम यांची पंचविसावी पुण्यतिथी नुकतीच धार्मिक आणि घरगुती वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
पुण्यतिथीचे औचित्य साधून, यावर्षी ‘तात्या माई शेती फार्म’च्या बोडकेवाडी येथील शाखेत पंचवीस फळझाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये वीस नारळ आणि पाच चिक्कू झाडांच्या रोपांची लागवड करून स्वर्गीय कदम यांच्या स्मृती जपण्यात आल्या.
तत्पूर्वी, गिरवी येथील मुक्त पत्रकार आणि स्वर्गीय बुवासाहेब कदम यांचे सुपुत्र अनिलकुमार कदम यांच्या निवासस्थानी प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी पसायदान पठणानंतर पुष्पवृष्टी करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.