पत्रकार सुभाष भांबुरे यांना पितृशोक


स्थैर्य, फलटण दि. 4 : येथील दैनिक नवराष्ट्रचे तालुका प्रतिनिधी तथा प्रगतशील शेतकरी सुभाष भांबुरे यांचे वडील प्रभाकर रामचंद्र भांबुरे यांचे आज दि.4 रोजी वयाच्या 79 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर येथील कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

जुन्या काळातील शिंपी समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून ते सर्वत्र परिचित होते. संजय गांधी निराधार योजनेतून अनेक गोरगरीबांना त्यांनी लाभ मिळवून दिला होता. त्यांच्या पश्‍चात एक मुलगा, तीन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.


Back to top button
Don`t copy text!