आशिष चांदोरकर यांना उपमुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली


दैनिक स्थैर्य । दि. २२ सप्टेंबर २०२२ । मुंबई ।  ज्येष्ठ पत्रकार आशिष चांदोरकर यांच्या अकस्मात निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. त्यांच्या निधनाने एक चांगला पत्रकार, संशोधक आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व आपल्यातून हिरावले आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, आशिष चांदोरकर यांनी ‘मॅन ऑन मिशन महाराष्ट्र’ या नावाने पुस्तक प्रकाशित केले होते. यासाठी त्यांनी महाराष्ट्रभर प्रवास केला होता आणि त्यात 2014 पासून सरकारच्या विविध योजनांचे लाभ तळागाळापर्यंत कसे पोहोचले, त्या यशोगाथांचा संग्रह त्यांनी प्रत्यक्ष लाभार्थींना भेटून तयार केला होता. त्यांच्या निधनाने एक संशोधकवृत्तीचा पत्रकार आपण गमावला आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे.


Back to top button
Don`t copy text!