स्थैर्य , वाई , दि. २९: वाई हत्याकांड प्रकरणात मृत मंगल जेधे व माफीची साक्षीदार ज्योती मांढरे या दोघींमध्ये 8 दिवसांत तब्बल 31 तास बातचित झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, पोळ यांनी जेल मधून अर्ज न करता थेट वकिलांच्या माध्यमातून कोर्टापुढे तक्रारी मांडा, न्यायाधीशांनी बजावले.
सध्या सातारा जिल्हा न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरु असून उलटतपास सुरु आहे. गुरुवारी नियमित याची सुनावणी सुरु होती. डॉ.पोळ जेलमधून वारंवार तक्रारअर्ज करत असल्याने न्यायाधिशांनी त्याबाबत सुनावले. प्रत्येक सुनावणीसाठी तुम्हाला सातार्यात आणले जाते. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगही होते. अशावेळी तुम्ही तक्रार करत नाही. जेलमधून मात्र तक्रारअर्ज करत असता. आता इथून पुढे तुम्ही थेट वकीलांच्या माध्यमातून तक्रार द्या, असे न्यायाधिशांनी सुनावले.
दरम्यान, शुक्रवारी उलटतपासामध्ये मंगल जेधे व माफीची साक्षीदार यांचे आठ दिवसात तब्बल 31 तास फोनवर झाल्याचे समोर आले. याबाबत पोलिसांनी जे सीडीआर दाखल केले त्यातून ही बाब समोर आली. याशिवाय मेसेज झाल्याचेही न्यायालयात समोर आले. न्यायालयात सकाळच्या प्रहरी ही सुनावणी झाले. यावेळी विशेेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, संशयित आरोपी डॉ.सतोष पोळ, माफीची साक्षीदार ज्योती मांढरे, बचाव पक्षाचे वकील न्यायालयात उपस्थित होते. आज शुक्रवारी पुन्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे.