पर्यावरण पूरक होळी करण्याकडे कल

लाकडांचे दहन करण्याऐवजी गोवर्‍याचा वापर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 12 मार्च 2025। सातारा । हुताशनी क्षणी पौर्णिमा अर्थात होळी हा सण पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा करण्याकडे सातारकरांचा कल वाढत आहे. होळीचा रंगांचा सण नात्यांचा, दुष्ट आणि वाईट प्रवृत्तींचे निर्दालन करणारा म्हणून सण साजरा केला जातो .हा सण रंगांचा आणि सर्वांचा आनंद द्विगुणीत करणारा असतो. त्यामुळे तो पर्यावरण पूरक साजरा करावा असे आवाहन सातार्‍यातील सामाजिक संघटनांनी केले आहे.

होळी म्हणजे वाईट गुणांचे दहन आणि चांगल्या पद्धती परंपरांचा संकल्प अशा होळीच्या सणासाठी सातारा नगरी सज्ज झाली आहे. मात्र होळीमध्ये लाकडांचे दहन करण्याऐवजी गोवर्‍या शेण्या यांचा वापर करून होळी सण साजरा करण्याकडे कल दिसून येत आहे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सातारा यांच्यावतीने पर्यावरण पूरक होळीसाठी वृक्षारोपण ,पोळी दान, तसेच वृक्ष संवर्धन या विविध उपक्रमांचे आवाहन करण्यात आले आहे. सातारा शहर आणि परिसरामध्ये गेल्या वीस वर्षापासून अंधश्रद्धा निर्मूलन समिती पर्यावरणाचा समतोल, पाण्याचा अपव्यय टाळणे आणि वाईट प्रवृत्तींचे दहन हा संदेश घेऊन जनजागरणाचे काम करत आहेत. होळीमध्ये नैवेद्य म्हणून वाहण्यात येणारे अन्न, पोळी, नारळ इत्यादीचे संकलन करून ते गोरगरीब वस्तीमध्ये वाटप करण्याचे नियोजन आहे.

फुले हळद किंवा इतर वनस्पतींच्या स्त्रोतापासून बनवलेले सेंद्रिय व नैसर्गिक रंग निवडावेत असे आवाहन करण्यात येत आहे. सणासुदीच्या या काळात जास्त पाणी वाया न घालवता मर्यादित पाण्याचा वापर करून होळी साजरी केली जावी असे आवाहन सातारा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे .सातारा शहराला दररोज दोन एमएलडी पाणीपुरवठा केला जातो बहुतांश ठिकाणी निळ्या रंगाच्या नळ कनेक्शन चे नळ उघडून त्यातून पाणी घेतले जाते आणि गळतीने लाखो लिटर पाणी वाया जाते त्यामुळे सातारकरांनी होळीचा आनंद साजरा करताना मर्यादित पाण्याचा वापर करावा असे आवाहन पालिका प्रशासन करत आहे. याशिवाय होळीच्या निमित्ताने वृक्षतोड ऐवजी वृक्षसंवर्धनाचा उपक्रम होणार आहे. यानिमित्ताने अजिंक्यतारा किल्ल्यावर वृक्षांचे वृक्षारोपण केले जाणार आहे.


Back to top button
Don`t copy text!