ट्रेलने सोशल कॉमर्स प्लॅटफॉर्म ‘ट्रेल शॉप’ लॉन्च केला

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि.२२: भारतातील सर्वात मोठा लाइफस्टाइल कम्युनिटी मंच ट्रेलने सोशल कॉमर्स मंच ‘ट्रेल शॉप’ लॉन्च केला आहे. या सोशल कॉमर्स मंचाद्वारे देशातील लाखो की ओपिनियन लीडर्सना (केओएल) लघु उद्योजक बनण्यासाठी तसेच त्यांचे अनुभव आणि शिक्षण समाजासोबत शेअर करून उत्पन्नाचा स्रोत निर्माण करण्यास त्यांना सक्षम करण्याचा ट्रेलचा उद्देश आहे. ट्रेलवर ६५% पेक्षा जास्त महिला वापरकर्त्या असून समाजात त्यांना आर्थिक स्थान मिळवून देत त्यांचे आर्थिक सबलीकरण होण्यास याद्वारे हातभार लागेल असा विश्वास ट्रेलचे सहसंस्थापक पुलकित अग्रवाल यांनी व्यक्त केला.

मंचावरील केओएल हे ब्रँड आणि संभाव्य ग्राहकांमधील दरी भरून काढत आहेत. त्यांचे विषय कौशल्य शेअर करत तसेच ग्राहकांना विविध उत्पादने आणि सेवांबाबत त्यांच्या भाषेत ते जागृत करत आहेत. यामुळे वापरकर्त्यांना माहितीपूर्ण निर्णय घेणे तसेच या मंचाच्या माध्यमातूनच उत्पादन खरेदी करण्यास मदत मिळत आहे.

या मंचाच्या स्थापनेपासून मेकअप, वैयक्तिक काळजी, आरोग्य व वेलनेस या श्रेणींमध्ये ५०० पेक्षा जास्त प्रस्थापित व भावी ब्रँडसोबत ट्रेलने भागीदारी केली आहे. ट्रेलला समाजाकडूनही जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. हा आर्थिक व्यवहारांमध्ये १०० टक्के मासिक वृद्धी असलेला हा वेगाने वृद्धींगत होणारा भारतातील सोशल कॉमर्स मंच ठरला आहे. सध्या या मंचावर १० अब्जाहून अधिक मासिक व्ह्यूज असून ८ भारतीय भाषांमध्ये तो उपलब्ध आहे.


Back to top button
Don`t copy text!