मौजे सासकल येथे ‘बिहारी पॅटर्न’ अंतर्गत लावण्यात आलेली झाडे ग्रामपंचायतीच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे गेली जळून

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २३ मे २०२२ । फलटण । सासकल ता.फलटण येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत (मनरेगा) बिहारी पॅटर्न राबण्यात येत आहे. या अंतर्गत दत्तात्रय चिमाजी मुळीक व सोमनाथ बंडू खुडे या दोघांना बिहारी पॅटर्न अंतर्गत १०० – १०० दिवसांसाठी २०० वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्या कामाची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर रक्कम अदा करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या बिहारी पॅटर्न प्रमाणे मौजे सासकल याठिकाणी लावण्यात आलेल्या २०० झाडांपैकी शेळ्यांच्या व जनावरांच्या उपद्रवामुळे १५३ वृक्ष लागून निघाली होती.

महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी ही लोकप्रतिनिधींसह ग्रामस्थांनीही वृक्षारोपण जास्तीत जास्त करण्यावर विशेष भर दिला आहे.पृथ्वीचे वाढणारे तापमान रोखण्यासाठी व आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्याची व त्याचे संगोपन करण्याचे आव्हान त्यांनी केले आहे. परंतु सासकल ग्रामपंचायतीने या आव्हानाकडे दुर्लक्ष केले आहे.’बिहारी पॅटर्न’अंतर्गत नेमण्यात आलेल्या दोघांनीही झाडांच्या संगोपनाची जबाबदारी व्यवस्थित पार पाडली. परंतु त्यांचा करार संपल्यानंतर ग्रामपंचायतीने सदर झाडांना कुंपण घालून संगोपन करण्याची गरज होती. त्यासंदर्भात संबंधितांनी झाडांना कुंपण घालून देण्याविषयी ग्रामपंचायतीला विनंती केली होती. परंतु ग्रामपंचायतीने त्यावर कोणताही निर्णय न घेतल्याने लावण्यात आलेली झाडे ग्रामपंचायतीच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे जळून गेली. या वृक्ष लागवडीस ड्रिप मार्फत पाणीपुरवठा केला जात होता. गावात कोणत्याही स्वरूपाचा पाणी तुटवडा नसताना ते ड्रीप चे कनेक्शन ही सोडवून ठेवण्यात आले आहे.

त्यामुळे शासनाने यावर खर्च केलेले पैसे वाया गेले.लागून निघालेल्या झाडांपैकी ८० टक्के झाडे जळून गेली आहेत.उर्वरित वृक्ष जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. बिहारी पॅटर्नप्रमाणे श्री.दत्तात्रय चिमाजी मुळीक व श्री.सोमनाथ बंडू खुडे यांच्याकडील देखभाल व संगोपनाचे दिलेले काम ग्रामपंचायतीने काढून घेतले. परंतु या वृक्षांकडे ग्रामपंचायतीने कोणत्याही स्वरूपाचे लक्ष न दिल्यामुळे व अक्षम्य दुर्लक्षामुळे ८० टक्के झाडे जळून गेली आहेत. त्यामुळे गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांनी तातडीने ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक यांच्यावर कडक कारवाई करावी व उर्वरित झाडांचे संगोपन करण्याचे आदेश द्यावेत. तसेच गट विकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांनी दोषींवर योग्य ती कारवाई करून जळून गेलेल्या झाडांच्या जागी दोन वर्षांची वाढ झालेली जुनी झाडे स्व खर्चातून पुन्हा लावण्याचा संबंधितांना आदेश द्यावा.संबंधितांवर योग्य ती कारवाई न केल्यास सासकल जन आंदोलन समितीच्या वतीने मा. जिल्हाधिकारी सो. व मुख्य कार्यकारी अधिकारी सो. यांचेकडे तक्रार करण्यात तक्रार येईल.


Back to top button
Don`t copy text!