माऊली फौंडेशनच्यावतीने मुधोजी महाविद्यालयात वृक्षारोपण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. 03 जुलै 2021 । फलटण । श्रीसंत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळादिनी माउली फाऊंडेशनच्यावतीने वसुंधरा संवर्धन आणि हरितवारी या उपक्रमाअंतर्गत मुधोजी महाविद्यालय फलटण येथे पर्यावरण पूरक रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. मुधोजी महाविद्यालयाचे नवनियुक्त प्रभारी प्राचार्य डॉ.पंढरीनाथ कदम आणि माउली सेवेकरी दीपक फरांदे, माजी प्रभारी प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड, मुंबई उच्च न्यायालयातील ऍड. विशवनाथ टाळकुटे यांच्या हस्ते हा वृक्षारोपणाचा उपक्रम संपन्न झाला.

यावेळी मुधोजी कॉलेज परिसर हरित करण्यासाठी विशेष कष्ट घेणारे डॉ सुधीर इंगळे, प्रा.सतीश पवार आणि झाडाची जोपासना करणारे वनपाल आणि कर्मचारी यांचा निसर्गप्रेमी म्हणून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी माऊलीच्या फलटण टीममधील सेवेकरी निलेश गनबोटे, अभिजित माळवदे, ऍड. नामदेव शिंदे, ऍड. राहुल कर्णे, पत्रकार नसिर शिकलगार, प्रशांत धनवडे , प्रा. मनीष निंबाळकर, डॉ. गणेश शिंदे, जावेद शेख, विशाल मोहाटकर, ऍड. राहुल सतुटे, हेमंत भोई, विलास जाधव, वीरेन सटाले इत्यादी निसर्गप्रेमींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

प्रास्ताविकात ऍड. विशवनाथ टाळकुटे यांनी, मागील चार वर्षात आषाढीवारी दरम्यान माउली फाउंडेशनमार्फत लावण्यात आलेल्या 500 हुन अधिक वृक्षांची उत्तम जोपासना महाविद्यालातील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. ऍड. राहुल कर्णे यांनी आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!