पर्यावरण रक्षणासाठी व निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज – श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर


दैनिक स्थैर्य । दि. १२ ऑगस्ट २०२२ । फलटण । मानेवाडी- ताथवडा येथे गोविंद दूध डेअरी संचलित मानेवाडी फलटण येथे श्री.कीर्तीकुमार बनकर यांच्या दूध चीलींग प्लांटवर गोविंद डेअरी फलटण यांच्या सहकार्याने शेणातून बायोगॅस निर्मिती प्लांट प्रकल्प प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न झाला.या वेळी सर्व दूध उत्पादक व शेतकरी यांच्याशी संवाद साधण्यात आला. यावेळी प्रत्येक  प्रसंगी पर्जन्यमानाच्या समतोल राखण्यासाठी  वृक्ष संपदा कशी जपणे आवश्यक असल्याचे महत्व पटवून देण्यात आले.यावेळी गोविंद डेअरीचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सर्व पदाधिकारी व शेतकरी यांच्या समवेत वृक्षारोपण केले.त्याप्रसंगी त्या भागातील सर्व दूध उत्पादक शेतकरी, गोविंद डेअरीचे सर्व पदाधिकारी,पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!