जिजाऊ सेवा संघाचे कार्य कौतुकास्पद : पौर्णिमा तावरे


दैनिक स्थैर्य । दि. १२ ऑगस्ट २०२२ । बारामती । महिलांसाठी विविध उपक्रम राबवत असताना सामाजिक भान आणि जाण जपत जिजाऊ सेवा संघाने नेहमी समाजबिमुख  उत्तम पद्धतीने कार्य केलेले आहे,  महिलांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ निर्माण केले आहे,महिला सक्षमीकरण साठी सहकार्य करीत आहेत  त्यामुळे जिजाऊ सेवा संघाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे  बारामती नगरपरिषद च्या मा. नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे यांनी केले.
बारामती तालुका मराठा सेवा संघ व जिजाऊ सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने श्रावण धमाका फेस्टिवल 2022 चे आयोजन जिजाऊ भवन या ठिकाणी करण्यात आले होते या  प्रसंगी ‘ उत्कृष्ट महिला नगराध्यक्षा’ म्हणून पौर्णिमा तावरे यांना गौरवण्यात आले यावेळी सत्काराला  उत्तर देताना  जिजाऊ सेवा संघाच्या कार्याचे कौतुक केले.
या प्रसंगी  जिजाऊ सेवा संघाच्या अध्यक्षा हेमलता परकाळे  उपाध्यक्षा स्वाती ढवाण,  कार्यध्यक्षा  सुनंदा जगताप,  सह कार्यध्यक्षा प्रतिभा बर्गे, खजिनदार संगीता शिरोळे, सह खजिनदार  अर्चना परकाळे, सचिव वंदना जाधव, सहसचिव ज्योती खलाटे, सदस्या  प्रियंका नलवडे व  सुवर्णा केसकर व  बारामती सहकारी बँकेच्या संचालिका कल्पना शिंदे बारामती तालुका मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष प्रदीप शिंदे,वाहतूक संघटना चे अध्यक्ष तानाजी बांदल,शिवसुंदर पेंट्स चे प्रवीण मोरे, रॉयल किचन च्या संचालिका सोनाली जगताप,  उज्वल आरोग्य सेवाभावी प्रतिष्ठान चे अध्यक्ष जगन्नाथ जगताप बुधरानी हॉस्पिटलचे नेत्र तपासणी  तज्ञ अप्पासाहेब काळे आदी मान्यवर  उपस्थित होते.
“महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी महिलांनी महिलासाठी सुरू केलेले विविध वस्तूचे  प्रदर्शन, नागपंचमी निमीत्त पारंपरिक खेळ व महिलासाठी  डोळे तपासनी शिबीर आयोजित केले   या  मध्ये मोतीबिंदू झालेल्या रुग्णावर मोफत  शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे   जिजाऊ सेवा संघाच्या अध्यक्षा हेमलता परकाळे यांनी सांगितले.
विविध क्षेत्रात उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा सन्मान  करण्यात आला.   स्टॉल धारक यांचा लकी  ड्रॉ काढण्यात आला प्रथम  मीना जाधव  द्वितीय ऋतुजा काकडे व तृतीय  निखिल खंडाळे आणि उत्तेजनार्थ धवल गांधी यांचा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले तर आभार सुनंदा जगताप यांनी मानले.

Back to top button
Don`t copy text!