ताथवडा डोंगरावर आज विविध संस्थाच्या वतीने वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन मोहिम


दैनिक स्थैर्य । दि. 06 जुलै 2025 । फलटण । येथील नेचर्स अ‍ॅण्ड वाईल्डलाईफ वेलफेअर सोसायटी, वनविभाग, डॉक्टर्स असोसिएशन, पीडीए क्रिकेट कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले संतांषगडाच्या नजिक असणार्‍या ताथवडा डोंगर रांगामध्ये वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

याबाबत ेचर्स अ‍ॅण्ड वाईल्डलाईफ वेलफेअर सोसायटच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे की, नुसतच म्हणतो धरणी माय पण तिच्यासाठी करतो काय???, वृक्षवल्ली आम्हा सोयरे, ही ओळ आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत. पण खरं तर या खर्‍या सोयर्‍यांसाठी आपण कधी काही केलंय का ?चला तर मग ती वेळ आलेली आहे, आपल्या खर्‍या सोयर्‍यांसाठी काहीतरी करण्याची. त्यासाठी ताथवडा डोंगरामध्ये करण्यात येत असलेले वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन मोहिमेत सर्वांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या मोहिमेत सहभागी होण्यासाठी 9766550890, 9011572689 या दुरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचे आवाहन सुध्दा करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!