स्थैर्य, सातारा , दि.९ : सातारा शहरातील ग्रेड सेपरेटरचे हस्तांतरण सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सातारा पालिकेकडे करण्यात येणार आहे. या तयारीचा भाग म्हणून सातारा पालिका व बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी सोमवारी सकाळी करण्यात आली. अंर्तगत मार्गिकांचे पाण्याचे आऊटलेट स्वच्छ करण्याची मागणी सातारा विकास आघाडीचे पक्ष प्रतोद अॅड दत्ता बनकर यांनी केली.
या पाहणीच्या वेळी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता दिलीप चिद्रे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल अहिरे, शाखा अभियंता रविराज आंबेकर यावेळी उपस्थित होते.
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी ग्रेड सेपरेटरची देखभाल दुरुस्ती सातारा पालिकेकडे द्यावी अशी सूचना ग्रेड सेपरेटरच्या उदघाटनाच्या कार्यक्रमात केली होती. त्यानुसार आज सकाळी पालिका आणि बांधकाम विभागाचे संयुक्त पाहणी सोमवारी सकाळी पार पडले. आज पुन्हा अंर्तगत रस्त्यांची तसेच कोणत्या सुविधा द्यायच्या या संदर्भाने चर्चा करण्यात आली. रस्त्यालगत पाण्याचे जे आऊटलेट आहेत त्या सर्व स्वच्छ करून मिळाव्यात. अंर्तगत भागात रस्त्यावर येणारे पाणी बाहेर काढण्याची व्यवस्था असावी, अशी मागणी अॅड दत्ता बनकर यांनी केली. ग्रेड सेपरेटरमध्ये लावण्यात आलेले दिवे सुरू आहेत का? याचीही चाचपणी झाली. आपत्कालीन स्थितीत लाईट गेल्यास त्यासाठी पॉवर जनरेटरची सोय करण्यात येणार आहे. या शिवाय रस्त्यांची कामे पालिकेच्या वार्षिक मंजूर दराने करण्यात येतील. ग्रेड सेपरेटरच्या हस्तांतरणाची प्रक्रिया येत्या काही दिवसात पूर्ण करण्यात येईल असे उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.