दैनिक स्थैर्य | दि. ३० ऑगस्ट २०२३ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित, कृषी महाविद्यालय फलटणच्या सातव्या सत्रातील विद्यार्थ्यांनी सोनवडी खुर्द गावातील महिलांना दुग्धजन्य पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण नुकतेच दिले.
ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत गुरुवार, दि. ११ ऑगस्ट रोजी सोनवडी खुर्द, ता. फलटण येथील महिलांसाठी दुग्धजन्य पदार्थाचे प्रशिक्षण देण्यात आले. घरगुती पद्धतीने दुधाचे पदार्थ कसे बनविण्यात येतात, व्यावसायिक दृष्टीकोनातून त्याचे उत्पादन कसे घ्यायचे, यावर विद्यार्थ्यांनी थोडक्यात माहिती दिली.
या कार्यक्रमात सरपंच सौ. शालन सूर्यवंशी, उपसरपंच शरद सोनवलकर आणि गावातील महिला, कृषी महाविद्यालय फलटणचे कृषीदूत केदार घनवट, भूषण गायकवाड, शुभम कोकणे, अंगद कागणे, शुभम आडके, दुर्वेश बोराटे, गणेश कोळेकर उपस्थित होते. हा कार्यक्रम पार पाडण्यास विद्यार्थ्यांना कृषी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण सर आणि श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर सर तसेच कार्यक्रम अधिकारी स्वप्नील लाळगे सर, प्रा. नीलिमा धालपे मॅडम, प्रा. नीतीषा पंडित मॅडम आणि प्रा. रश्मी नायकवडी मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.