दैनिक स्थैर्य | दि. ३ सप्टेंबर २०२३ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त, कृषी महाविद्यालय फलटण येथील अंतिम वर्षातील विद्यार्थिनींनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२३-२४ या कार्यक्रमांतर्गत पिंपरद गावातील महिलांना दुग्धजन्य पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण दिले.
यावेळी विद्यार्थिनींनी घरगुती पद्धतीने लस्सी बनविण्याचे प्रशिक्षण दिले व व्यावसायिक दृष्टिकोनातून त्याचे उत्पादन कसे घ्यायचे, याविषयी माहिती दिली. तसेच कृषीकन्यांनी घरगुती दुग्धजन्य पदार्थ बनवून नफा मिळवण्याबाबत माहिती सांगितली. या कार्यक्रमासाठी सरपंच सौ. स्वाती भगत आणि गावातील इतर ३० महिलांनी उपस्थिती दाखवली.
कृषी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे, प्रा. नितिशा पंडित आणि प्रा. रश्मी नायकवडी यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली कृषीकन्या प्रतिक्षा जगताप, अक्षदा जाधव, प्रणिता गोडसे, आर्या जाधव, समृद्धी जगताप, आरती जाधव, निशिगंधा खुडे यांनी हे प्रात्यक्षिक करून दाखविले.