स्थैर्य, मुंबई, १९ : भारतातील सर्वात मोठ्या लाइफस्टाइल-कम्युनिटी कॉमर्स प्लॅटफॉर्म ट्रेलने सीरीज ए राउंडमध्ये केटीबी नेटवर्क च्या नेतृत्वात ११.४ दशलक्ष डॉलर जमा केल्याची घोषणा केली आहे. सॅमसंग व्हेंचर्स, टीचेबलचे सीईओ अंकुर नागपाल, पिंटरेस्ट, स्क्वेअर, डोरडॅशचे बोर्ड मेंबर गोकुळ राजाराम आणि गूगल प्ले स्टोअर डेव्हलपमेंटचे माजी प्रमुख विनीत बुच यांनी फायरबोल्ट व्हेंचर्ससोबत सध्याचे गुंतवणूकदार सिक्वोइयाचे सर्ज, फोसुन आरझेड कॅपिटल आणि डब्ल्यूईएच व्हेंचर्स यांच्यासह राउंडमध्ये सहभाग नोंदवला.
ट्रेल एक मोबाइल अॅप्लिकेशन असून यूझर्सना सौंदर्य, पाककृती, फॅशन, वैयक्तिक काळजी, टेक्नोलॉजी आणि गॅझेट्स, चित्रपट आणि टीव्ही समीक्षण यासारख्या श्रेणींमध्ये आपली आवड आणि छंदानुसार, ३ मिनिटांचे व्हर्टिकल व्हिडिओ यावर स्थानिक भाषेत शेअर करता येतात.
नव्या फेरीत मिळालेल्या गुंतवणुकीचा वापर कम्युनिटीचा विस्तार आणि विकास करण्यासाठी केला जाईल. प्लॅटफॉर्मचे पर्सनलायझेशन आणि अॅडव्हान्स मशीन लर्निंग अल्गोरिदम तसेच एआयसोबत रिकमंडेशन वाढवण्याकरिता या निधीचा वापर केला जाईल. तसेच यूझर्सला उत्साहवर्धक अनुभव देण्यासाठी नव्या सुविधाही यात दिल्या जातील. याच गोष्टींना मजबूती देण्यासाठी ट्रेल एका ऊर्जावान आणि सर्जनशील टीमला जोडण्याच्या प्रक्रियेत आहे. ही टीम आपल्या प्रेक्षकांशी सहानुभूती राखेल.
ट्रेलचे सह-संस्थापक पुल्कित अग्रवाल म्हणाले, “ आम्ही केटीबी नेटवर्क आणि सॅमसंग व्हेंचर्सला आमच्या प्रवासातील भागीदार बनवत असल्याने उत्साही आहोत. आमच्या व्हिजननुसार, आम्ही लाखो भारतीयांना उत्कृष्ट जीवनशैलीचे पर्याय निवडण्यास समर्थ बनवण्यासाठी सदैव तत्पर आहोत.”