दुःखद निधन:केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे 74 व्या वर्षी निधन, सहा दिवसांपूर्वी झाली होती दुसरी हार्ट सर्जरी


 

स्थैर्य, दि.९: केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन झाले आहे. गुरुवारी दिल्लीतील हॉस्पीटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 74 वर्षीय पासवान मागील काही दिवसांपासून आजारी होते आणि दिल्लीतील एस्कॉर्ट हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. रामविलास पासवान यांचा मुलगा चिराग पासवान यांनी ट्वीटरवरुन माहिती दिली.

काही दिवसांपूर्वी झाली होती हार्ट सर्जरी

रामविलास पासवान मागील एक महिन्यापासून हॉस्पीटलमध्ये अॅडमिट होते. एम्समध्ये 2 ऑक्टोबरच्या रात्री त्यांच्यावर हार्ट सर्जरी झाली होती. ही पासवान यांची दुसरी हार्ट सर्जरी होती. यापूर्वी त्यांची एक बायपास सर्जरी झाली होती.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!