
स्थैर्य, मुंबई दि. 6 : बौध्दजन सहकारी संघ मुंढर, शाखेचे सचिव अरुण गुणाजी गमरे यांच्या मातोश्री सरस्वती गमरे यांचे वयाच्या ९८ व्या वर्षी अल्पशा आजाराने नुकतच दुःखद निधन झाले, अतिशय मनमिळाऊ, प्रेमळ व सर्वसमावेशक अश्या सरस्वती गमरे यांच्या अकस्मात निधनाने सर्वच शाखा पदाधिकारी, सभासद व ग्रामस्थ यांच्यावर शोककळा पसरली आहे.
त्यांच्यामागे त्यांचा मुलगा, नातू, तीन मुली व नातवंडे असा परिवार आहे. अरुण गमरे यांच्यावर ओढवलेल्या या दुःखद प्रसंगात शाखा क्र. २४ गाव मुंढर, मुंबई शाखा, दोन्ही शाखांचे पदाधिकारी, सभासद व सर्व मुंढर ग्रामस्थ व नातेवाईक सहभागी आहेत तसेच कोरोना व्हायरस कोव्हिड १९ या वैश्विक महामारीचे भान ठेवून दिवंगत सरस्वती गमरे यांच्या शोकसभेचा कार्यक्रम नायगाव येथील त्यांच्या राहत्या घरी शासकीय नियम व सोशल डिस्टसिंगचे पालन करत अत्यंत साध्या पद्धतीने रविवार आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती शाखेने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात शाखेचे सरचिटणीस अनिल जाधव यांनी दिली आहे.