वित्तवर्ष २०२२ मध्ये गुंतवणूक योग्य ५ टॉप क्षेत्र

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, दि.९: वित्तवर्ष २०२२ काही दिवसातच सुरु होणार आहे. नुकत्याच झालेल्या बजेटच्या घोषणांना शेअर बाजारानेही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अर्थमंत्र्यांनी त्यांच्या लहानशा दिमाखदार मेड-इन-इंडिया टॅबलेटद्वारे अर्थसंकल्प सादर केल्यापासून बेंचमार्क निर्देशांक आधीच ९% वधारला आहे. यावर्षी गुंतवणूक करताना कोणत्या क्षेत्रांवर आणि त्यांच्या स्टॉक्सवर नजर ठेवावी याबद्दल सांगताहेत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे इक्विटी स्ट्रॅटजिस्ट श्री ज्योती रॉय.

बीएफएसआय: बीएफएसआय सेक्टरला, लिशेषत: पब्लिक सेक्टर बँकांना बळकटी देण्यासाठी सरकारने अनेक घोषणा केल्या आहेत. त्यापैकी २०,००० कोटी रुपये तणावाखालील मालमत्तांसाठी बॅड बँकांच्या पुनर्भांडवलीकरणासाठी व सहकार्यासाठी देण्यात आले. किफायतशीर गृहनिर्माणसाठी हाऊसिंग फायनान्स कंपन्यांना १ वर्षाची अतिरिक्त कर सवलत मिळाली. तसेच डिस्कॉमना कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्थांसाठी डिस्कॉम-आधारीत योजनांकरिता पुढील ५ वर्षांसाठी ३.०५ लाख कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. स्टॉक्स: एसबीआयएन, बीओबी, एलआयसी हाऊसिंग फायनान्स, कॅनफिन होम, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन आणि आरईसी.

औषधनिर्मिती: आरोग्य सेवेसाठी यावर्षी अर्थमंत्र्यांनी वित्तवर्ष २०२२ मध्ये २,२३,८४६ कोटी रुपये असा दुप्पट निधी राखून ठेवला. कोव्हिड-१९ च्या लसीकरिता ३५,००० कोटी रुपये अतिरिक्त वितरित केले, तसेच यात आणखी वाढ करण्याची तयारीही दर्शवली. स्टॉक्स: अपोलो हॉस्पिटल, नारायण हृदयालय, कॅडिला आणि सिपला.

मौल्यवान धातू, रत्ने आणि दागिने: सोने व चांदीवरील सीमा शुल्क १२.५% वरून ७.५% कमी करण्यात आले असले तरीही कृषी पायाभूत व विकास उपकर सोने, चांदी व डोअर बार्सवर लावण्यात आला आहे. सिंथेटिक कट आणि पॉलिश केलेले स्टोन (रत्ने) यावर सरकार १५% सीमा शुल्क आकारले. यापूर्वी ते ७.५% आकारले जात असे. या निर्णयांमुळे भारतातील दागिने बनवणाऱ्या कंपन्यांना मोठा फायदा होणार आहे. स्टॉक्स: टायटन कंपनी व वैभव ग्लोबल.

वस्त्रोद्योग: पीएलआय योजनांसह, सरकारने टेक्स्टाइल पार्कमध्ये मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा केली. नायलॉन चिप्स, नायलॉन फायबर, कॅप्रोलॅक्टम आणि धाग्यावरील सीमाशुल्क ७.५% वरू ५% वर केले. या निर्णयमामुळे भारतीय वस्त्रोद्योग कंपन्यांमध्ये विविध जागतिक पातळीवर यशकथा लिहिल्या जाऊ शकतात. स्टॉक्स: सियाराम सिल्क मिल्स, अरविंद लि. आणि वर्धमान टेक्स्टाइल्स.

सौरपंप: भारत स्वच्छ व हरित भविष्याकड़े वाटचाल करत असताना, प्रगती करणाऱ्या हरित क्षेत्रांचा तुमच्या पोर्टफोलिओत समावेश करणे आवश्यक आहे. या वर्षी सरकारने सौर कंदिल व सौर इन्व्हर्टर्सवरील सीमाशुल्क ५% वरून अनुक्रमे १५% ते 20% वाढवले आहे. यामुळे देशांतर्गत उत्पादन आणि काही अग्रेसर कंपन्यांसाठी हा निर्णय लाभदायक ठरेल. स्टॉक्स: शक्ती पंप्स आणि क्रॉप्टन ग्रीव्ह्स कंझ्युमर इलेट्रिकल्स.


Back to top button
Don`t copy text!