‘डायरी ऑफ पेन्डॅमिक’ संदर्भग्रंथाचे उद्या प्रकाशन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २६ डिसेंबर २०२१ । सातारा । कोविड महामारी सुरू असतानाच त्यातील एकूण एक संदर्भाचं देशातील पहिलं पुस्तक मराठीत तयार झालं आहे. आदर्श शोध पत्रकारिता पुरस्कार प्राप्त दीपक प्रभावळकर यांनी लिहिलेल्या ‘कोविडायन – डायरी ऑफ पेन्डॅमिक’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवार, दिनांक 28 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता, जिल्हा मध्यवर्ती बँक सातारा सभागृहात होत असून यावेळी अमेरिकेचे डॉ. रवी गोडसे, आमदार महेश शिंदे, आमदार निलेश लंके यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
महामारीचा पहिल्या शतकापासून इतिहास, कोविड काळातील आंतरराष्ट्रीय संशोधन, जगभरात नवनव्या औषधांचे शोध, भारतातील नियम व त्यांची शास्त्राsक्त माहिती – चुका, जगभरातले मेडिकेशन प्रोटोकॉलचा तुलनात्मक अभ्यास, भारतातले लेखकाने उघड करून शासनाला मान्य करायला लावलेले घोटाळे, औषधांचे दाखवून दिलेले दुष्परिणाम, कोण होते लॉकडाऊन लावणारे व कोण होते भोगणारे,
लसींवरील गतिमान संशोधन व परिणामकारकता, भारतीय संशोधन नाकारून देशाला भोगावे लागलेले नुकसान, बळी कोविडने घेतले की चुकीच्या प्रोटोकॉलने घेतले? राज्या राज्यात नियम व औषधे वेगवेगळी का होती? ही महामारी होती का विषाणू युद्ध? WHO ची संदिग्ध भूमिका, ब्रिटन, अमेरिका, युरोप आणि अन्य देशांतले लागलेले शोध, लाटाप्रिय लोकांची व शासनांची भूमिका, लसीकरण झालं तरी यापुढे येणारे व्हेरियंट व त्यांची दाहकता, झिनोम सिक्वेन्सीगच्या अभ्यासातून महामारी संपली का यापुढेही अशा लाटा येतच राहणार आहेत का?

अशा एकूण एक बाबींचा संदर्भ ग्रंथ असलेल्या या कोविडायन-डायरी ऑफ पेन्डॅमिकला अमेरिकेचे डॉ. रवी गोडसे यांची प्रस्तावना तर मॅगेसेसे पुरस्कार प्राप्त डॉ. प्रकाश आमटे यांचे लेखी आशीर्वाद लाभले आहेत. तसेच upsc, mpsc तसेच तरुणांच्या व अंध दिव्यांग तरुणांना उच्च अधिकारी बनवण्या उत्थानासाठी कार्यरत देशातील एकमेव संस्था दीपस्तंभकडून याचे प्रकाशन होत आहे.


Back to top button
Don`t copy text!