दैनिक स्थैर्य । दि. ०८ मे २०२३ । सातारा । ‘ मानवाच्या उत्क्रांतीच्या अवस्थेपासूनच संशोधनाला प्रारंभ झालेला आहे आणि त्याचबरोबर मानवी जीवन हे संशोधनामुळेच उन्नत बनत असलेले दिसते.परंतु आजच्या एकविसाव्या शतकात आंतर विद्याशाखीय संशोधनाचा कल बदलत चाललेला आहे असे प्रतिपादन प्रा.डॉक्टर एस एच मुजावर यांनी केले. रयत शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित रयत शिक्षण परिषदेत ‘रयत शिक्षण संस्थेमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण-2020 ची अंमलबजावणी’ या विषयावरील कार्यशाळेत ते रिसर्च, इनोव्हेशन टेक्नॉलॉजी या विषयावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा येथील प्राचार्य डॉ.ज्ञानदेव म्हस्के हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते.
या व्याख्यानात बोलताना प्रा.डॉ. एस. एच. मुजावर यांनी विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण व्हावी म्हणून प्रयत्न करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले. त्याचबरोबर संशोधनाच्या क्षेत्रातील नॅनो टेक्नॉलॉजी, रिचार्जेबल बॅटरी,सोलर सेल, होलोग्रम, टेक्नॉलॉजी मॅग्नेटिक मटेरियल, वॉटर पुरिफिकेशन टेक्नॉलॉजी, ट्रान्सपरंट डिस्प्ले या संशोधनाच्या नव्या संकल्पनांची मांडणी केली. कल्पना ते
तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञान ते पेटंट ही साखळी त्यांनी या ठिकाणी उलगडून दाखविलली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.पी. व्ही. चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. आसावरी शिंदे -कदम प्रा. सुवर्णा कुरकुटे आणि प्रा. यू. ए. पाटील यांनी केले या कार्यशाळेस रयत शिक्षण संस्थेतील वेगवेगळ्या महाविद्यालयातील प्राचार्य तसेच अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक, उपप्राचार्य व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समन्वयक बहुसंख्येने उपस्थित होते.