वाघाच्‍या हल्‍ल्‍यात मृत झालेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या कुटूंबियांना ५ लाख रूपयांची तात्‍काळ मदत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०८ मे २०२३ । चंद्रपूर । चंद्रपूरच्‍या इंदिरानगर येथील रहिवासी पुरूषोत्‍तम बोपचे (४० वर्ष) हे फुले वेचण्‍यासाठी वनामध्‍ये गेले असता वाघाने त्‍यांच्‍यावर जबरी हमला केला व त्‍यात त्‍यांचा जागीच मृत्‍यु झाला. या दुर्देवी घटनेनंतर महाराष्‍ट्राचे वने, सांस्‍कृतिक कार्य, मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बोपचे यांच्‍या परिवाराला शासन नियमानुसार मदत करण्‍याचे निर्देश दिले. त्‍यानुसार वनविभागाने बोपचे यांच्‍या कुटूंबास ५ लाख रूपयांचा धनादेश पालकमंत्री मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते प्रदान केला.

यावेळी देवराव भोंगळे, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. कारेकर,  माजी उपमहापौर राहूल पावडे, माजी नगरसेविका चंद्रकला सोयाम, दिनकर सोमलकर, डॉ. गिरीधर येडे, मनोज पोतराजे, पप्‍पु बोपचे, प्रलय सरकार, आशिष ताजने व त्‍या प्रभागातील कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. यापुढील मदतीची रक्‍कम या कुटूंबाला लवकरात लवकर देण्‍याचे निर्देश ना. मुनगंटीवार यांनी यावेळी अधिका-यांना दिले.


Back to top button
Don`t copy text!