दैनिक स्थैर्य | दि. 09 जुन 2024 | फलटण | माढा लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या माध्यमातून अर्थात भारतीय जनता पार्टीच्या वतीने रणजितसिंह नाईक निंबाळकर हे रिंगणात होते. माढा लोकसभा मतदारसंघात विरोधकांच्या एकजुटीमुळे व राज्यात असणाऱ्या भाजपा विरोधी लाटेने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव झाला आहे. जर आज रणजितसिंह नाईक निंबाळकर हे खासदार म्हणून विराजमान झाले असते तर नक्कीच आज मोदी 3.0 मध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर हे केंद्रीय मंत्री म्हणून बघायला मिळाले असते असे मत राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.
राज्यामध्ये टॉप 10 खासदारांच्या मध्ये काम करण्याऱ्या खासदार म्हणून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची छबी तयार झाली होती. केंद्रामध्ये व राज्यातील वरिष्ठ नेत्यांच्या सोबत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अगदी सलोख्याचे संबंध तयार केले आहेत. त्यामुळे जर माढा लोकसभा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर निवडून गेले असते तर नक्कीच ते केंद्रीय मंत्री झाले असते.