
दैनिक स्थैर्य | दि. 22 एप्रिल 2025 | फलटण | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्रदादा पवार यांच्या आज वाढदिवस विविध उपक्रमांनी संपन्न होणार आहे. युवा नेते युगेंद्रदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फलटण तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये प्रामुख्याने आज मंगळवार, दि. २२ एप्रिल रोजी वाढदिवसाच्या निमित्ताने कपाशी (मोटेवाडी) येथील शरयू ऍग्रो इंड्रस्टीज लिमिटेड येथे सकाळी ९ वाजल्यापासून सायंकाळी ४ वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार, दि. २२ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता बारामती येथील भिगवण रोड वरील असणाऱ्या चिराग गार्डन येथे शुभेच्छा स्वीकारणार आहेत.
बुधवार, दि. २३ एप्रिल रोजी घाडगेवाडी येथे सकाळी 10 वाजता युवा नेते युगेंद्रदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये फलटण तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना AI अर्थात आर्टिफिशियल इंटीलिजन्स आधारावर शेती कशी करता येवू शकते यावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.