समाजातील काही व्यक्तिमत्वही अशी असतात की, लांबून अंदाज बांधणे फार अवघड होते. मग उगाचच न बोलता एका शब्दाचाही संवाद न होता. जेव्हा एखाद्या व्यक्तिमत्वाबद्दल अंदाज बांधले जातात. तेव्हा आश्चर्य वाटल्यावाचून रहात नाही.
अशाच व्यक्तिमत्व मधले जीवाभावाचे मित्र ॲडव्होकेट शिवप्रसाद वाघमोडे हे एक असेच उमदे, दिलदार, दिलखुलास व्यक्तिमत्व आहे. आज शिव यांचा वाढदिवस आहे. माजी सेवानिवृत्त प्राचार्य वाघमोडे सर यांचे चिरंजीव एवढी ओळख त्यांच्याबाबतीत पुरेशी नाही. तर राजकारण, समाजकारण आणि अर्थशास्त्राचा अभ्यासक अशी एक त्यांची वेगळी ओळख आहे. सहज, सोप्या आणि विनोदी शैलीत त्यांना उत्तम संवाद कौशल्य अवगत आहे. शिवप्रसाद म्हणून फार जवळून यांना अनुभवता आले आहे.
निगर्वी, प्रेमळ आणि अत्यंत आदराचे बोलणे. कोणत्याही प्रसंगात जिव्हाळा, आपलेपणा जपण्याची आणि समोरच्याला आधार देण्याचा त्यांचा स्वभावगुण विरळाच! छ.शिवाजी महाराज, छ.संभाजी महाराज, नेताजी सुभाषचंद्र बोस या महान आदरणीय व्यक्तिमत्वाबद्दल मिळेल ती पुस्तके, खंड वाचनाची त्यांना आवड आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर अतिशय सुंदर व्याख्यान ते देतील एवढ्या बारकाईने, चिकीत्सकपणे मग तो शाहूपुरीचा अर्थसंकल्प असो वा देशाचा असो की, एखाद्या नगरपालिकेचा वार्षिक आराखड्याची मांडणी असो हा त्यांच्या अभ्यासाचा विषय असतो. शाहुपुरीच्या वार्षीक आराखड्यात नियोजन करताना काय असायला हवे हे सांगण्यास ते कधीही विसरत नाहीत. त्यांचा राग क्षणभंगूर आणि जिव्हाळा, प्रेम अखंडपणे असते.
चुकीचे वाटले तर जरुर समजावतील, सांगतील. एखाद्या क्षणी त्यांच्या पध्दतीने व्यक्तही होतील. परंतू मनात कुणाबद्दलही आकस, राग न धरता तितक्याच स्वच्छ मनाने हाक मारुन एवढे काय रागवायचे? असे उलट विचारुन नेहमीच्या खळाळत्या हास्याने समोरच्याला आपलेसे करणारे हे व्यक्तिमत्व आहे. ‘मुहँ मे राम बगल में छुरी! अशी कपटनिती शिवप्रसाद यांच्या जवळपासही नाही. त्यांचे व्यक्तिमत्व हे स्पष्ट आहे. कोणाबद्दलही मनात राग न ठेवता, राग न धरता संवाद साधणारे हे व्यक्तिमत्व आहे. दुपारच्या वेळी कोणी भेटलाच तर ‘अहो, जेवलात काय? खोट बोलू नका. तुमचे जेवण झालेले नाही. पहिले जेवून घ्या, मग चर्चा..असा आस्थेवाईकपणा आणि आपलेपणा फक्त शिवप्रसाद यांच्यापाशीच अनुभवायला मिळतो.
समाजपयोगी एखादी भुमिका घेताना त्याची मांडणी, त्यांच्या स्वभावातला स्पष्टवक्तेपणा आणि आंतरिक असणारी तळमळ दिसुन येते. सातारच्या तसेच शाहूपुरीच्या राजकिय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील तरुणाईला योग्य दिशा देणारे हे व्यक्तिमत्व आहे. शिवप्रसाद यांच्यामध्ये एक छान अभिनयाचे उत्तम अंग असलेला कलावंत दडलेला आहे. एखाद्या ठिकाणी ताण-तणावाचे वातावरण असेल तर शिवप्रसाद नर्मविनोदी स्वभावाने तिथले वातावरण एकदम हलके करुन टाकतील.एखाद्या बैठक, सभेतील वातारणही शिवप्रसाद सहज सोप्या आणि विनोदी शौलीतील संवादाने सभागृहात हास्याचे कारंजे निर्माण करण्यात त्यांचा हातखंडा आहे. अशा या हरहुन्नरी, दिलखुलास, स्वच्छ मनाच्या शिवप्रसाद वाघमोडे यांना राजेंद्र केंडे व परिवार यांचेकडून वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा!