
मूठभर वाईट वागणाऱ्या लोकांमुळे चांगलं वागणं कधीच सोडू नका. कारण ही दुनिया चांगल्या वागणाऱ्या लोकांमुळेच टिकून आहे. आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला जातो. सत्वपरीक्षा द्यावी लागते. गैरसमज, गैरविश्वास, निरर्थक चर्चा असल्या अफवांचे जोमदार पिक चांगुलपणावर धडकते. त्यावेळी चांगुलपणाने संयमी, ठाम, निश्चयी भूमिकेत रहावे.
सोन्याचे महत्व अग्नितून आल्यावर, बीज भूमीत गाडल्यावर, मडके भाजल्यावर, भाकर तव्यावर, नांव पाण्यावर, दही घुसळल्यावरच चांगुलपणाची मोहोर उमटते.
मूठभर वाईट वागणा-या प्रवृत्तीला वेळीच पायबंद घातल्यास चांगुलपणा वाढीस लागेल. अलिकडच्या काळात लबाडाच तोंड मोठ अन् ख-याच्या तोंडाला कुलूप. पण सत्याचा वाली परमेश्वर आहे. उशीरा का होईना पण चांगुलपणाच टिकणार. जनता जनार्दन मद्यपानवर शंका घेत नाही पण दूधावर शंका ठरलेली. महिनाभार रतिब घातल्यावर दूधाचा हिशोब. बाकीच न बोल्यास बरं.
शेवटी काय येड्यातला येडा बाभळीला दगड मारत नाही. आंब्याच्या झाडाला सुट्टी नाही. आपण आपला चांगुलपणा थोड्याशा प्रलोभाने न सोडता टिकवल्यास रसाळ फळं पिढ्यान पिढ्या मिळणार. अपत्यला संपत्ती परीस चांगुलपणाची कास धरायला लावल्यास आयुष्याची आमराई बहरणारच.