समृद्धी महामार्गाच्या कामाची सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पाहणी


दैनिक स्थैर्य । दि.३० मार्च २०२२ । बुलडाणा । राज्याचे नगर विकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मेहकरजवळील फर्दापूर इंटरचेंजजवळ हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची पाहणी केली. यावेळी केंद्रीय ग्रामविकास समिती अध्यक्ष तथा खासदार प्रतापराव जाधव, माजी वनमंत्री संजय राठोड, आमदार संजय गायकवाड, तहसिलदार संजय गरकल, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पाहणी दरम्यान मंत्री श्री. शिंदे यांनी उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.


Back to top button
Don`t copy text!