आज २७ मार्च – वाचनालयात चमत्कार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


सातारा क्रांतीकारकाच्या जिल्ह्यातील फलटण जवळील एका गावामध्ये अभ्यास करण्याचा चमत्कार झाला. गावच्या वाचनालयात एक लेकरु अभ्यास करीत हो बसला.

वाचन करताना त्याने स्वामी विवेकानंद, शाहू महाराज, ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तसेच शिवरायांचे शैक्षणिक विचार वाचले व मुलाने मन लावून अभ्यास केला व तो मुलगा जिल्हा अधिकारी (IAS) झाला व त्याच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या व तो आता चांगले जीवन जगतो आहे. त्या मुलाने ही गोष्ट त्यांच्या मित्रांना सांगितली व त्याचे मित्र सुद्धा चांगल्या गुणांने उत्तीर्ण झाले. काही मित्रांनी हे खोट समजलं ते पक्षाचे झेंडे घेऊन कार्यकर्ते बनले आहेत. नंतर वडापावच्या गाड्यावर काम करतायेत.

त्याच गावांमधल्या अनेक तरुणांनी अभ्यास करून एमपीएससी तयारी केली असता आज अनेक तरुण पोलीस अधिकारी, प्रशासकीय अधिकारी झाले तसेच बारामती येथील एका मुलाने ही गोष्ट ऐकून अभ्यास केला तो आता पुणे येथे जजच्या पोस्टवर आहे.

खंडाळा येथील एका बेरोजगार युवकांना हा संदेश कळला त्यांनी अभ्यास केला व तो आता सरकारी शिक्षकांची नवकरी करतोय. तेव्हा त्याने अभ्यास करण्याचा संदेश १०० जणांना पाठविला. एका झोपडपट्टी मधील बाईने हा संदेश वाचला तीने आपल्या लहान मुलाला अंगणवाडी मध्ये पाठवले तो लगेचच क ख ग बोलायला लागला.

एका माणसाने हे खोटे आहे असे समजले तर त्याचा मुलगा निरक्षर झाला व आता भंगार गोळा करतोय.

ऊतू नका मातू नका शिक्षणाचा वसा टाकू नका. सावित्रीच्या लेकरांनो शिक्षण ही सर्व समस्यांची गुरुकिल्ली आहे. हा चमत्कार सर्वांना पाठवा.

अंधश्रद्धा मुक्त भारत शिक्षण हेच साध्य व साधन

आपलाच शिक्षण प्रवाही – प्रा.रवींद्र कोकरे – ग्रामीण कथाकार,

श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण.
९४२१२१६८२१


Back to top button
Don`t copy text!