झुक झुक अगीनगाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहू या मामाच्या गावाला जाऊ या. ह्या बालगीताने बालपणीचा काळ नजरेसमोर उभा राहिला. गावाच्या वेशीवर स्वागतास वटवृक्ष, नदी काठी औंदुबर जळात पाय सोडून बसलेला, ओढ्यातल कंज्याळ, पिवळ्या धम्क फुलांची बाभळ, निंबाचा पारावर तमाश्यांचे खेळ, चिंचेच्या बनात देवाच्या काठ्या व कुस्ती तालीम, पिंपळ, नांदरूक, करंज, कवठ, जांभूळ, आंबा लाल परीच (एसटी) स्टन्ड, निरगुडीचा ताटवा, कावळी व समुद्र शोकाचा नजरणा. पागांरा, काटेसावर, पळस निष्पर्ण होऊन फुलांने बहरणे पाहणे नयन स्वर्गसुखच आहे. पण सार लोप पावत चाललंय.
वणवा लावणे ही प्रतिष्ठा बनली आहे. अनमोल जैवविविधता, पशू, पक्षी, प्राणी, गवत, झाडे यांना भस्मसात करुन आपण विनाश काली विपरीत बुद्धीकडे जात आहे. वणवा लावून आपण आपल्याच पायावर धोंडा मारुन घेतोय. ह्या प्रवृत्तीना वेळीच रोखणे गरजेच आहे.
आपण प्रत्येकांनी वृक्षरोपण वेगवेगळ्या निमित्तानं करावं. वृक्ष संवर्धन संगोपन करुन समाज देणं पूर्ण करावे.
वेगवेगळ्या बीया शेणात गोळे करुन उन्हात वाळवून पावसाळ्यापूर्वी डोंगर द-यात फेकल्यास वनराई नटेल.
सावलीला झाड अन् सोबतीला पुस्तकं असल्यावर जगात आपणाला काहीच कमी पडणार नाही.झाड झाडासारखी वागतात,माणसं माणसासारखी का वागत नाहीत.